Chhagan Bhujbal on Jitendra Awhad : आव्हाडांची भावना लक्षात घ्या, विरोधक म्हणून टीका करणं अयोग्य
Chhagan Bhujbal on Jitendra Awhad : आव्हाडांची भावना लक्षात घ्या, विरोधक म्हणून टीका करणं अयोग्य
मुंबई : विद्यार्थ्यांना भारतीय मूल्यांची ओळख व्हावी यासाठी शालेय शिक्षणात मनुस्मृतीच्या श्लोकांचा वापर करण्यात येणार आहे. याला राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी महाड येथे जाऊन चवदार तळ्याजवळ मनुस्मृतीचे दहन केले. यावेळी आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा (Dr. B. R. Ambedkar) फोटो फाडल्याचा दावा केला जातोय. त्यानंतर सत्ताधारी भाजप (BJP) चांगलीच आक्रमक झाली आहे. राज्यात ठिकठिकाणी आव्हाड यांच्याविरोधात आंदोलन केले जात आहे. आव्हाड यांचा निषेध केला जात आहे. यावरच आता राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षातील नेते तथा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आव्हाड यांनी माफी मागितली आहे, असे म्हणत भुजबळ यांनी आव्हाडांची पाठराखण केली आहे.