Chhagan Bhujbal On Chandrakant Patil - Uddhav Thackeray Meet : फडणवीस-ठाकरे भेटीत काय चर्चा झाली? भुजबळ काय म्हणाले?
Chhagan Bhujbal On Chandrakant Patil - Uddhav Thackeray Meet : फडणवीस-ठाकरे भेटीत काय चर्चा झाली? भुजबळ काय म्हणाले?
ही बातमी पण वाचा
Sushma Andhare: "विषय संपला", ठाकरे-फडणवीस भेटीवर सुषमा अंधारेंची मोठी प्रतिक्रिया!
पुणे : विधिमंडळात आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Devendra Fadnavis & Uddhav Thackeray in One Lift) यांनी एकाच लिफ्टमध्ये प्रवास केला. लिफ्टमध्ये प्रवास केला नागही तर दोन्ही नेत्यांनी संवाद साधला. त्या तीन मिनिटाच्या प्रवासाने महाराष्ट्राच्या राजकरणात मोठी खळबळ उडाली आहे. अनेक चर्चांना उधाण आले आहे. या भेटीवर शिवसेना उद्धव ठाकरेच्या नेत्या सुषमा अंधारेंनी (Sushma Andhare) प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही फडणवीस यांच्या नावावर आता फुली मारली आहे त्यामुळे विषय संपला आहे, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारेंनी दिली आहे. त्या पुण्यात बोलत होत्या.
सुषमा अंधारे म्हणाल्या, उद्धव साहेबांना एका ताटात जरी घेऊन फडणवीस जेवले तरी आम्ही फडणवीस यांच्या नावावर आता फुली मारली आहे, म्हणजे विषय संपला आहे. एकत्र येणार वगैरे काहीही असं नाही. योगायोगाने आपल्याकडे लिफ्ट पाच-पन्नास नाही त्यामुळे एकाच लिफ्टमधून ते गेले की याचा अर्थ लगेच एकत्र आले असा होत नाही.