एक्स्प्लोर

Chhagan Bhujbal Meet Sharad Pawar : शरद पवार यांच्या भेटीसाठी छगन भुजबळ वेटिंगवर, भेट घेऊनच परतणार, भुजबळांचा पवित्रा

Chhagan Bhujbal Meet Sharad Pawar : शरद पवार यांच्या भेटीसाठी छगन भुजबळ वेटिंगवर, भेट घेऊनच परतणार, भुजबळांचा पवित्रा

मुंबई :  राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे  शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भेटीसाठी सिल्वर ओक (Silver Oak) निवासस्थानी दाखल झाले आहेत. मात्र, छगन भुजबळ यांना शरद पवारांकडून भेट देण्यात आलेली नाही.  छगन भुजबळ एक तासापासून वेटिंगवर असल्याची माहिती आहे. शरद पवार यांची प्रकृती बरी नसल्यानं त्यांनी दोन दिवसांपासून भेटी गाठी आणि राजकीय कार्यक्रम रद्द केले होते. मात्र,  आज छगन भुजबळ थेट शरद पवार यांची वेळ न घेत सिल्वर ओकवर दाखल झाले. अद्याप छगन भुजबळ वेटिंगवर  असल्याचं समोर आलं आहे. 

छगन भुजबळ वेटिंगवर  

शरद पवार यांच्याकडून आज केवळ दोन व्यक्तींना भेटीसाठी वेळ देण्यात आली अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे. यापैकी एक असलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवनिर्वाचित आमदार मिलिंद नार्वेकर शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले होते. शरद पवारांची भेट घेतल्यानंतर मिलिंद नार्वेकर त्यांना सिल्वर ओक मधून बाहेर पडल्याची माहिती आहे. 

भेट घेतल्यानंतर बाहेर पडणार, छगन भुजबळ यांचा पवित्रा 

छगन भुजबळ मागील अर्ध्या तासापासून शरद पवार यांची वाट पाहत बसले आहेत. शरद पवार यांच्याकडून छगन भुजबळ यांना वेळ देण्यात आलेला नसल्याची माहिती आहे. मिलिंद नार्वेकर शरद पवारांची भेट घेऊन बाहेर पडल्यानंतर देखील छगन भुजबळ यांना भेट दिलेली नाही. शरद पवार यांची वेळ न घेताच छगन भुजबळ वेळ न घेताच भेटायला पोहचले आहेत. कुणालाही कुठल्याच प्रकारची कल्पना नसताना छगन भुजबळ भेटीसाठी दाखल झाल्यानं गोंधळ निर्माण झाला. 

शरद पवारांची भेट घेतल्यानंतर बाहेर पडणार असा पवित्रा छगन भुजबळ यांनी घेतल्याची माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. छगन भुजबळ यांना शरद पवार यांच्याकडून भेटीसाठी वेळ देण्यात येतो का ते पाहावं लागेल.  भुजबळ अद्याप शरद पवार यांची वाट पाहत बसले आहेत, अशी सूत्रांची माहिती आहे. 

 

 

 

महाराष्ट्र व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 17 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 11 PM : 17 September 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Lalbaugcha Raja Byculla Fire Brigade :  सायरन वाजवत लालबागच्या राजाला अग्निशमन दलाची सलामीVivek Phansalkar on Ganpati Visarjan : मुंबईतील गणपती विसर्जनसाठी गर्दी,आयुक्त फणसाळकर काय म्हणाले?ABP Majha Headlines : 11 PM : 17 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNana Patole on Vidhan Sabha:महाराष्ट्राला महायुतीचं विघ्न, पुढचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
Pune Ganesh Visarjan: पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
Ashok Chavan: आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
Embed widget