Chaityabhumi : विधानसभा अध्यक्ष Rahul Narwekar यांचं चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
विधानसभा अध्यक्ष Rahul Narwekar यांचं चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
आज ६७ वा महापरिनिर्वाण दिन, बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर भीमसागर, राज्यपालांसह, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून बाबासाहेबांना मानवंदना
Dr. Babasaheb Ambedkar Death Anniversary Mahaparinirvan Din : वर्णव्यवस्थेत हजारो वर्ष रंजल्या गांजल्या आणि गावकुसाबाहेर जीवन घालवलेल्या जीवांसाठी आयुष्य वेचलेल्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी रोजी 14 ऑक्टोबर 1956 रोजी महापरिनिर्वाण झाले. त्यापूर्वी त्यांनी अवघ्या दोन महिन्यांपूर्वी नागपुरात बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर या युगपुरुषाच्या महतीवर आज देश वाटचाल करतो आहे. प्रगल्भ लोकशाहीची बिरुदावली मिरवतो आहे. जगभरातील कायद्यांचा अभ्यास करून देशाला सर्वसमावेशक घटना देणाऱ्या या धुरंदर व्यक्तीमत्वाची चुणूक सर्वप्रथम करवीर संस्थानचे छत्रपती शिवछत्रपतींचे वंशज लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज (Rajarshi Shahu Maharaj) यांना आली होती. इतिहासकार डाॅ. जयसिंगराव पवार यांनी आपल्या "राजर्षी शाहू छत्रपती महाराज" या पुस्तकामध्ये या युगपरुषांच्या नात्यावर प्रकाश टाकला आहे.
एक अस्पृश्य जातीमधील उमदा तरूण परदेशातून शिकून आल्यानंतर त्याला भेटण्यासाठी स्वत: शाहू महाराज मुंबईमध्ये गेले होते. अस्पृश्य निर्मृलनासाठी लढा देणाऱ्या या दोन युगपुरुषांमधील संबंध अत्यंत स्नेहाचे आदराचे होते. बाबासाहेबांना शिक्षणासाठी शाहू महाराजांनी मदत केली होती. कोल्हापुरात बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत माणगाव परिषद झाली. राज्यात पुरोगामी फुले-शाहू-आंबेडकरांचा वारसा अभिमानाने सांगितला जातो. यामधील शाहू आणि आंबेडकर या द्वयींमधील स्नेह समतेच्या इतिहासात अजरामर झाला आहे.