(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chadrakant Khaire - Sandeepan Bhumre:संस्थान गणेशच्या सर्वपक्षीय कार्यक्रमात व्यासपीठावरच हमरीतुमरी
Chadrakant Khaire & Sandeepan Bhumre:संस्थान गणेशच्या सर्वपक्षीय कार्यक्रमात व्यासपीठावरच हमरीतुमरी
हेही वाचा :
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा काल गडचिरोलीमधील अहेरीत दाखल झाली होती. या यात्रेतील सभेत बोलातना अजित पवार यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. महायुतीच्या सरकारनं सुरु केलेल्या विविध योजनांची माहिती त्यांनी उपस्थित जनतेला दिली. गडचिरोलीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धर्मरावबाबा आत्राम हे सध्या अन्न व औषध प्रशासन मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर त्यांनी अजित पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. आगामी विधानसभा निवडणुकीत धर्मरावबाबा आत्राम यांच्या विरोधात त्यांची कन्या भाग्यश्री आत्राम राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा आहेत. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. घरामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करताय, हे समाजाला आवडत नाही. आम्ही पण अनुभव घेतलाय, मी चूक मान्य केलीय, असं अजित पवार यांनी सांगितलं.
अजित पवार काय म्हणाले?
आम्ही आणि धर्मरावबाबा आत्राम यांनी इतरांना शिकवलं आहे. वस्ताद त्याच्या हाताखाली शिकतो त्याला सगळे डाव शिकवत नाही. वस्ताद एक डाव राखून ठेवतो. अजूनही चूकभूल करु नका, तुमच्या वडिलांसोबत राहा. वडील लेकीवर प्रेम करतात तेवढं प्रेम लेकीवर करु शकत नाही, असं असताना तुम्ही त्याच्यामध्ये घरामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करताय, हे बरोबर नाही, समाजाला हे आवडत नाही, आम्ही अनुभव घेतलेला आहे, मी चूक मान्य केली. वस्तादांनी एक डाव राखून ठेवलेला आहे, तो दाखवायची वेळ आणू नका, असं अजित पवार म्हणाले. अजित पवार यांनी हा इशारा धर्मारावबाबा आत्राम यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम यांना दिला.