![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Buldhana : खेरडा येथील तलाठी कार्यालय बंद; तलाठ्याची महिलांसोबत अरेरावी
Buldhana : खेरडा येथील तलाठी कार्यालय बंद; तलाठ्याची महिलांसोबत अरेरावी राज्याच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) ही एक जुलैपासून सुरू केलीय. या योजने अंतर्गत 19 ते 65 वर्षातील महिलांना प्रत्येक महीन्याला 1500 रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आलीय. त्या नुसार योजनेचे अर्ज भरण्यासाठी ग्रामीण भागातील महिला, पुरुष ग्रामपंचायत कार्यालयावर मोठी गर्दी करताना दिसत आहे. या महत्वाकांक्षी योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑफलाईन अर्ज प्रक्रिया (Offline Application Process) सुरू झाली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणीसाठी 15 जुलै ही अंतिम तारीख देण्यात आली आहे. त्यामुळे ठिकठिकाणच्या नोंदणी केंद्राबाहेर महिलांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, काही ठिकाणी संबंधित विभागाचे काही कर्मचारी महिला लाभार्थ्यांची लूट करत असल्याच्या धक्कादायक घटनाही पुढे आल्या आहेत. महत्वाकांक्षी योजना ठरतेय डोकेदुखी? दरम्यान, बुलढाणा (Buldhana News) जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यातील खेर्डा बुद्रुक येथील ग्रामपंच्यायत मध्ये अर्ज भरण्यासाठी महिला पुरुषांची एकच गर्दी झाली होती. त्यावेळी तलाठी श्री काळे यांनी ग्रामस्थांशी हुज्जत घालत अर्ज स्वीकारणे बंद केले आणि माझी तक्रार कुठेही करा, आमदार, खासदार किंवा तहसीलदार यांच्याकडे तक्रार करा. मी अर्ज घेत नसल्याचे जाहीर करीत तलाठी निघून गेल्याचे वायरल व्हिडीओ मध्ये दिसून येत आहे. त्यामुळे एकीकडे महिलांसाठी महत्वाकांक्षी ठरलेल्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लगत असल्याचे चित्र आहे.
![ZERO HOUR With Sarita Kaushik | लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/05/62c46955062af1c41bbd0ae2cdfe772b1720201237566976_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)