एक्स्प्लोर
BMC Polls: '१२५ जागांवर दावा', राज ठाकरेंचा हा फॉर्म्युला उद्धव ठाकरेंना पटणार का?
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या (BMC Election) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मनसे (MNS) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या संभाव्य युतीच्या चर्चा सुरू असतानाच, मनसेने एक अंतर्गत सर्वेक्षण केले आहे. मुंबई महापालिकेतील २२७ जागांपैकी सुमारे सव्वाशे (१२५) जागांवर पक्षाची ताकद असल्याचा अंदाज या सर्वेक्षणातून समोर आल्याचे कळते. त्यामुळे युती झाल्यास या जागांसाठी मनसे आग्रही राहू शकते. दुसरीकडे, काँग्रेसने मात्र मनसेसोबत युती करण्यास किंवा एकत्रित निवडणुका लढवण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. उद्या, म्हणजेच ११ नोव्हेंबर रोजी, मुंबई महानगरपालिकेसाठी आरक्षणाची सोडत जाहीर होणार असून, त्यानंतर जागा वाटपाच्या चर्चेला अधिक जोर येईल असा अंदाज आहे. त्यामुळे एकही नगरसेवक नसलेल्या राज ठाकरेंचा हा सव्वाशे जागांचा फॉर्म्युला उद्धव ठाकरेंना मान्य होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
Ajit Pawar : अजित पवार चक्रव्यूहात, कोकाटे, मुंडे, पार्थ पवार नंचर आता ड्रग्ज प्रकरणाची डोकेदुखी
Maharashtra LIVE Superfast News : बातम्यांचा वेगवान आढावा : 18 DEC 2025 : ABP Majha
Manikrao Kokate Arrest Update : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
आणखी पाहा
Advertisement
Advertisement





















