Nawab Malik राजीनामा द्या! भाजप आक्रमक, राज्यभरात जोरदार आंदोलन
काल इडी ने नवाब मलिक यांनी अटक केली आणि त्यांना 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे तरीही काल महाविकस आघाडीच्या वतीने राजीनामा घेणार नसल्याचे सांगितल्यावर आज राज्यात भाजप च्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली आहे आज हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपच्या वतीने निदर्शने करण्यात आली आहेत. या वेळी नवाब मलिक यांनी मंत्री पदाचा राजीनामा द्यावा त्याच बरोबर या महाविकास आघाडीच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी या वेळी करण्यात आली तत्काळ मलिक यांनी मंत्री पदाचा राजीनामा द्यावा अन्यथा जिल्हाभरात आंदोलन करू आशि माहिती आंदोलकांनी दिली आहे. या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष रामराव वडकुते आमदार तान्हाजी मुटकुळे आणि अन्य भाजप पदाधिकारी उपस्थित होते.























