एक्स्प्लोर
Beed Heavy Rain : बीडमध्ये पावसाची बॅटिंग सुरूच, जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर
बीड जिल्ह्यात मध्यरात्रीपासून दमदार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. बीड शहरातील बिंदुसरा नदीने रौद्र रूप धारण केले आहे. शहराला पाणीपुरवठा करणारे बिंदुसरा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. पावसाची परिस्थिती पाहता बीड जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. अनेक भागांमध्ये पुरात अडकलेल्या नागरिकांना एनडीआरएफच्या मदतीने बाहेर काढण्यात आले आहे. ढगफुटीसारख्या पावसामुळे बीड जिल्ह्यात सोळा जनावरे दगावली आहेत. अनेक ठिकाणी खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही पिके पाण्याखाली गेली आहेत. जिल्ह्यातील पाणी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. जिल्हा प्रशासन मध्यरात्रीपासून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. नागरिकांनी अतिधाडस करू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement

आफताब शेख, एबीपी माझाCorrespondent
Opinion


















