Be Positive | टाकाऊ वस्तूंचा वापर करत रोपवाटिका, आतापर्यंत अडीच हजार रोपांचं वाटप
कोरोनाचे संकट सुरु झाल्यापासून गेल्या दीड वर्षात मुलांना शाळेत जाता आलेले नाही . घरात बसून ऑनलाईन अभ्यास करायचे आणि नंतर वेळ कसा काढायचा हाच सर्व शाळकरी मुलासमोर प्रश्न उभा राहायचा . तीच अवस्था पंढरपुरातील वरद आणि सृष्टी या लहान भावंडांची झाली होती . कोरोना हे नाव या दोंघाच्याही चांगलेच परिचयाचे झालेले यातच रोज बातम्यांमधून आणि पेपर मधून फक्त कोरोना हाच विषय सारखा कानावर पडत असल्याने सुरुवातीला घाबरलेला मोठा वरद याने या घर बसल्या काळात आपण काहीतरी करायचे असे ठरवले आणि त्याने रिकाम्या बाटल्या , तेलाचे मोकळे डबे , तेलाच्या पिशव्या फुटके डेरे असे साहित्य घराच्या टेरेसवर जमा करायला सुरुवात केली . कोरोनामध्ये लोकांना ऑक्सिजन लागतो आणि झाडे ऑक्सिजन देतात हे तो शिकला होता . यातूनच त्याने टेरेसवर बाग करायचे ठरवले .





















