Baramati BJP Banner : बारामतीत भाजपच्या बॅनरवर शिंदेंचा फोटो, पण अजितदादांचा फोटोच नाही
Baramati BJP Banner : बारामतीत भाजपच्या बॅनरवर शिंदेंचा फोटो, पण अजितदादांचा फोटोच नाही
बारामती भाजपकडून देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री यांचा फोटो असलेला लावलेला बॅनर सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतोय. देवा भाऊ लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये महिन्याला अशा आशयाचा फलक बारामतीत लागला आहे. फ्लेक्सवर महापुरुषांसोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांचा फोटो लावण्यात आलेला आहे. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो या फ्लेक्स वरून गायब आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बारामती जनसन्मान रॅली पार पडली. त्यावेळी फक्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे त्या बॅनर वरती फोटो लागले होते. म्हणून भाजपने लावलेल्या बॅनर वरती उपमुख्यमंत्री अजित पवारांचा फोटो लावण्यात आला नसल्याची बारामती जोरदार चर्चा रंगू लागली आहे. बारामती पुणे रस्त्यावर मेडद येथे हा फ्लेक्स लागलेला आहे.