एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bachhu Kadu : राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या कर्तव्य यात्रेला तुफान प्रतिसाद
ग्रामीण भागातील नागरिकांची सरकारी कार्यालयातील कामे वारंवार चकरा मारून ही होत नाही. तेच काम एका तासात करण्याचं उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून मागील 15 वर्षांपासून बच्चू कडू यांनी आपल्या मतदार संघातील चांदूरबाजार, अचलपूर तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण भागात 'कर्तव्य" यात्रेच्या माध्यमातून "राहुटी" उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. याची सुरुवात 20 नोव्हेंबर पासून सुरू झाली असून या यात्रेदरम्यान नागरिकांची प्रलंबित कामे जागेवरच निकाली काढण्यात येत आहेत. या कर्तव्य यात्रेला तुफान प्रतिसाद मिळतोय...
प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राज्यमंत्र्याची राहुटी आपल्या गावात हा उपक्रम मागील 15 वर्षांपासून राबवला आहे, आपल्या मतदार संघातील प्रत्येक गावात या उपक्रमात गावातील समस्या गावातच निकाली निघत असून यात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी उसळली आहे.
20 नोव्हेंबर पासून या कर्तव्य यात्रेला सुरुवात झाली असून अचलपूर मतदार संघात ही यात्रा संपली की संपूर्ण राज्यात ही कर्तव्य यात्रा जाणार असल्याचं बच्चू कडू म्हणाले.. स्वतः बच्चू कडू हे जागेवर खाली बसून नागरिक घेऊन आलेले कामे समजून घेऊन ते अधिकाऱ्यांना सांगून करून घेत आहे. यापूर्वी आमदार असतानाही बच्चू कडू यांच्याकडून हा उपक्रम राबविण्यात येत होता. आता, मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतरही त्यांनी ही सेवा सुरुच ठेवली आहे. राज्यमंत्री बच्चू कडू हे आपल्या सेवाव्रत कामासाठी परिचीत आहेत. सर्वसामान्य, गरिब अन् दिव्यांग व्यक्तींसाठी हे धावून येतात, आमदार असताना बच्चू कडू यांनी आपल्या मतदारसंघात ''आमदाराची राहुटी आपल्या गावात'' ही योजना राबवली होती. त्यांची हीच योजना आता राज्यमंत्र्याची राहुटी आणि आता कर्तव्य यात्रा आपल्या गावात अशी बनली आहे. या उपक्रमात सर्व शासकीय अधिकारी या कर्तव्य यात्रा उपक्रमात येत असून नागरिक घेवून आलेले कामे येथे होत आहे.
महाराष्ट्र
Eknath Shinde Satara : एकनाथ शिंदेंची तब्येत बिघडली, ताप आल्यानं आराम करण्याचा डॉक्टरांचा सल्ला
Ajit pawar On EVM : विरोधकांकडून नुसता रडीचा डाव सुरु आहे, अजितदादांचा हल्लाबोल #abpमाझा
Mahayuti Oath Ceremony : 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता नव्या सरकारचा शपथविधी
Uddhav Thackeray On Mahayuti :विधानसभेची मुदत संपल्यानंतरही राष्ट्रपती राजवट का लागू केली नाही-ठाकरे
Mahadev Jankar Vs Raosaheb Danve : EVM हॅक करता येतं मी स्वत: इंजिनिअर : महादेव जानकर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement