Aurangabad : चालत्या दुचाकीवर प्रेमीयुगुलाचा किसिंग सीन,जोडप्याचे अश्लील चाळे : ABP Majha
नवीन वर्षाच्या दुसऱ्या दिवशी औरंगाबादमध्ये एक विचित्र प्रकार समोर आलाय. या व्हिडीओमध्ये धावत्या दुचाकीवर एक तरुण आणि तरुणी अश्लील चाळे करताना पाहायला मिळतायत. चालत्या दुचाकीवर तरुण-तरुणी एकमेकांना किस करत असल्याचा व्हीडिओ व्हायरल होतोय. दुचाकी वेगाने धावत असताना तरुणी गाडीच्या पेट्रोल टँकवर चालकाकडे तोंड करुन बसलेली या व्हिडीओत पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार औरंगाबादमध्ये अपघातांसाठी आणि सतत वर्दळीचा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालना रोडवर घडल्याचं सांगण्यात येतंय. दुचाकीवरील हे दोघे नेमके कोण आहेत याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. प्रेमाच्या नावाखाली हे दोघं स्वतःसोबत इतरांचा जीव धोक्यात घालत असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर येतायत. तसंच पोलिसांनी या दोघांवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही होतेय.























