Ashok Chavan Majha Vision Full : जामनगर निर्यातीत मुंबईपेक्षा पुढे, अशोक चव्हाणांच अभ्यासू भाषण
Congress Leader Ashok Chavan, Majha Maharashtra Majha Vision 2023: 'माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन' (Majha Maharashtra Majha Vision) या कार्यक्रमात बोलताना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी आपलं राज्यासाठीचं व्हिजन मांडलं. अनेक राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. तसेच, गेल्या अनेक दिवसांपासून अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यासंदर्भातही पुन्हा एकदा अशोक चव्हाणांनी आपली बाजू स्पष्ट केली. तसेच, 'माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन' या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या 'प्लान सी'बाबत विचारलं होतं. त्यावर बोलताना अशोक चव्हाणांनी 'प्लान आर'नं उत्तर दिलं.






















