Ashish Shelar : मुख्यमंत्र्यांनी Sharad Pawar यांच्याकडून संयमी वृत्ती शिकावी, आशिष शेलार यांचा टोला
शिवसेनेने शरद पवारांबरोबर आघाडी केली आहे. परंतु शरद पवार यांची संयमी वृत्ती शिवसेनेने स्वीकारली नाही. अजूनही शिवसेनेची संकुचित वृत्ती आहे. त्यामुळे संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्या पाठशाळेत शिकवणी लावावी असा सल्ला भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी दिला आहे. ते आज रत्नागिरीत एबीपी माझाशी बोलत होते.
भाजप नेते आशिष शेलार यांनी सिंधुदुर्गामध्ये लावण्यात आलेल्या जमावंबदीच्या आदेशावरुन शिवसेनेवर सडकून टीका केली. ते म्हणाले की, "नारायण राणे हे कोकणचे सुपुत्र आहेत, परंतु त्यांचा सिंधुदुर्ग दौरा आल्यामुळे राजकीय हेतूने सिंधुदुर्ग जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश दिले आहेत. सामान्य माणूस नारायण राणे यांना भेटू नये. यासाठी ठाकरे सरकारने कुहेतूने जमावबंदीचा आदेश लागू केला."























