एक्स्प्लोर
Owaisi Rally | Ahilyanagar मध्ये MIM च्या Owaisi यांची सभा, तणावाच्या आरोपांनंतर आगमन
एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांची अहिल्यानगरमध्ये सभा होत आहे. ही सभा काही दिवसांपूर्वी शहरात निर्माण झालेल्या तणावामुळे लांबणीवर टाकण्यात आली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका लक्षात घेता या सभेला महत्त्व प्राप्त झाले आहे. ओवैसींची सभा होऊ नये यासाठी विरोधकांनी शहरात तणाव निर्माण केल्याचा आरोप एमआयएमने केला आहे. यापूर्वी कोल्हापूरमध्येही ओवैसींच्या सभेला विरोध झाला होता, त्यावेळी त्यांच्यावर भडकावू भाषणे करत असल्याचा आरोप करण्यात आला होता. सध्या असदुद्दीन ओवैसी मंचावर दाखल झाले आहेत. या सभेतील त्यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या संदर्भात संग्राम जगताप यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "त्याला रहित गुन्हे काही मानते अशीतली परिस्थिती नाही. ते विश्वासार्हता नसताना लोकं येते त्यामुळे त्यांचा विषय कुठेही कदापी कधी येत नाही आणि ते म्हणू नको टेलिव्हिजनवर फक्त दिसतात शेवटी सर्विकरीता दिसतात पण मनाने आणि बटन दाबताना ते वेगळंच असतं सगळं."
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















