Anupam Kher : तुमचं जीवन आणि तुमच्या जीवनातील धड्यांसाठी धन्यवाद टाटा
Anupam Kher : तुमचं जीवन आणि तुमच्या जीवनातील धड्यांसाठी धन्यवाद टाटा
टाटा समूह आणि भारतीय उद्योग क्षेत्राची पताका आंतरराष्ट्रीय पातळीवर मानाने फडकावणारे ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांनी बुधवारी रात्री मुंबईत दीर्घ आजाराने निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून रतन टाटा यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. रतन टाटा (Ratan Tata) यांनी स्वत: दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट करत आपली प्रकृती ठीक असल्याचे सांगितले होते. मात्र, बुधवारी त्यांची प्रकृती खालावत गेली आणि रात्रीच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. रतन टाटा हे केवळ एक उद्योजक म्हणूनच नव्हे तर सामान्य व्यक्तींच्यादृष्टीनेही कुतूहलाचा विषय होते. रतन टाटा यांचे कर्तृत्व, त्यांचा साधेपणा किंवा त्यांचे श्वानप्रेम यांची अनेक किस्से सामान्य जनतेत कायम चर्चेचा विषय असायचे. रतन टाटा यांच्याशी सामान्य लोकांचा थेट संबंध येत नसला तरी त्यांच्याविषयीच्या अनेक दंतकथा रतन टाटा आणि 'कॉमन मॅन'चा एक खास ऋणानुबंध तयार झाला होता. हा ऋणानुबंध किती घट्ट होता, याचा प्रत्यय बुधवारी रतन टाटा यांच्या निधनानंतर आला.