Anna Hazare: अण्णा हजारे उपोषण करण्याच्या तयारीत, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून इशारा ABP Majha
राज्य सरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसंबंधी घेतलेले धोरण अत्यंत घातक असून, या निर्णायामुळे युवा पिढी व्यसनाधीन होण्याची भीती आहे...केवळ राज्याचा महसूल वाढवण्यासाठी वाईन उत्पादक आणि विक्रेते यांचे हितासाठी घेतलेला हा निर्णय दुर्दैवी असून हा निर्णय सरकारने मागे घेतला नाही तर उपोषण हाच एकमेव पर्याय आमच्याकडे राहिला असल्याचे सांगत येत्या 14 फेब्रुवारी पासून राळेगणसिद्धी येथील यादवबाबा मंदिरात आमरण उपोषण करणार असल्याचे अण्णांनी म्हटले आहे... सरकारने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा यासाठी आम्ही वारंवार सरकारसोबत पत्रव्यवहार केला, स्मरणपत्र पाठवले मात्र अद्याप सरकारकडून कोणताही निर्णय न झाल्याने समाजाच्या हितासाठी हे आपले अखेरचे उपोषण असल्याचेही अण्णांनी म्हंटले आहे.






















