Amravati University चा भोंगळ कारभार चव्हाट्यावर?; MBA द्वितीय वर्षातील विद्यार्थिनीचा प्रवेश रद्द
एमबीएची प्रथम वर्षाची परीक्षा दिल्यानंतर द्वितीय वर्षात प्रवेश झाल्यावर विद्यार्थिनीचा प्रवेश रद्द करण्याचा अजब प्रकार अमरावती विद्यापीठने केला आहे. हेमा शर्मा या विद्यार्थिनीने 2019-20 या शैक्षणिक सत्रात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात एमबीएला प्रवेश घेतला. प्रवेश समितीकडे गुणपत्रिकेची सत्यप्रत वगळता सर्व कागदपत्रे सादर केली. गुणपत्रिका अनुशेष विषयांमुळे विद्यापीठाकडून उशीरा मिळणार असे विद्यार्थिनीने प्रवेश समितीला सांगितले. प्रवेश समितीने गुण पत्रिका मिळताच आमच्याकडे सादर करावी असे सांगितले. दरम्यान 4 डिसेंबर 2019 ला विद्यार्थिनीच्या अनुशेष विषयांचा निकाल लागल्यावर तिने गुणपत्रिका प्रवेश समितीकडे दिली आणि समितीने सांगितले की आता प्रवेश निश्चित झाला. त्यानंतर एमबीएच्या पहिल्या दोन सत्राच्या परीक्षा दिल्या आणि त्यात ती उत्तीर्ण ही झाली. एमबीए भाग दोनसाठी प्रवेश घेऊन ऑनलाईन वर्गाला हेमा उपस्थित होती. असे असतांना 28 ऑक्टोबर 2020 रोजी कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी हेमाचा प्रवेश रद्द करण्याचा पत्र तिला घरी पाठवलं.. या पत्रामुळे हेमाला आणि तिच्या कुटुंबाला आश्चर्याचा धक्काच बसला. विद्यापीठ प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित करत हेमा शर्मा हिने विद्यापीठाने योग्य न्याय दिला नाही, तर आत्महत्या करण्याची परवानगी मागितली आणि तिची प्रत तिने मुख्यमंत्री पासून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांना पाठवल्याने एकच खळबळ उडाली.