Amravati T 20 World Cup Celebration : T 20 विश्वचषक विजयाचा अमरावतीत जल्लोष
Amravati T 20 World Cup Celebration : T 20 विश्वचषक विजयाचा अमरावतीत जल्लोष भारत आणि साऊथ आफ्रिकेत आज टी20 विश्व चषक फायनल सामना होणार आहे.. भारत आज फायनल जिंकणारच असा विश्वास अमरावती येथील हनुमान व्यायाम मंडळ मधील ज्युनिअर क्रिकेट खेळाडू यांनी एबीपी माझावर बोलताना सांगितले.. आज संपूर्ण भारत देश फायनल जिंकणार अशी प्रार्थना करतेय.. विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पंड्या यांच्याकडे खेळाडू आणि भारत वासीयांची अपेक्षा आहे... रोहित शर्मानं भारतानं टी 20 वर्ल्ड कप फायनलमध्ये विजय मिळवल्यानंतर जंगी सेलिब्रेशन केलं. रोहित शर्मानं उपकॅप्टन हार्दिक पांड्याला त्याच्या कामगिरीबद्दल कौतुक म्हणून किस केलं. हार्दिकनं क्लासेन आणि मिलरची विकेट घेतली. रोहित शर्मानं पत्नी रितिका सचदेव हिला विजयानंर मिठी मारत विजय साजरा केला. रोहित शर्माच्या नेतृत्त्वात भारतानं जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा, वनडे वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत धडक दिली होती. मात्र, भारताला विजेतेपद मिळालं नव्हतं. अखेर रोहितच्या टीम इंडियानं अपयश पुसून टाकलं आहे. भारतानं 7 धावांनी मॅच जिंकली. विराट कोहलीवर रोहित शर्मानं विश्वास टाकला होता. अखेरच्या मॅचमध्ये रोहित , रिषभ अन् सूर्यकुमार लवकर बाद झाल्यानंतर विराट कोहलीनं केलेल्या 76 धावा गेमचेंजर ठरल्या. रोहितनं विराटला मिठी मारली.रोहित शर्मानं बारबाडोसच्या स्टेडियमवर नतमस्तक होत तिथूनच भारतमातेला वंदन केलं.