Amravati : पत्ता सांगण्याचे 5 रुपये, पैसे स्वत: कडे न ठेवता त्यातून गरिबांना मदत!
अमरावती शहरातील मुख्य बाजारात जर गेलं तर एक घड्याळाचं दुकान सर्वांना आकर्षित करून घेतं.. ते यासाठी की त्या रस्त्यावर लागलेल्या दुकानात दोन बॅनर लागले ज्यामध्ये लिहलंय की, "पत्ता सांगायचे 5 रु. पडतील" आणि "हे असे का लिहीले आहे, हे सांगायचे 10 रु. पडतील".. हे लिहण्यामागे ह्या दुकांदारांचे हेतू तर लक्षात येतोय की लोकं याची दुकान कुठेय, त्याची दुकान कुठेय हे असेन.. पण अजून अनेक कारण आहे ज्यात महत्वाचं आहे ते म्हणजे शिकलेले आणि समजदार लोकं पण त्या दुकानाच्या बाजूला असूनही या घड्याळ वाल्या दुकानदारांना विचारतात की हे दुकान कुठेय..कोणी तर दारूची दुकान विचारतो त्यामुळे ही नामी शक्कल या घड्याळ दुकानदार रघुनाथ सावरकर यांनी लढविली आहे





















