Diwali 2021 Decoration : पंढरपुरातील अमोल वाखारकरची कलाकृती, देखाव्यात साकारली विक्रांत युद्धनौका
दिवाळीला किल्ले हे लहान मुलांसाठी फटाके फोडण्या इतकेच आवडीचे असते. अशाच आवडीतून गेले 20 वर्षे किल्ले बनविणाऱ्या पंढरपूरच्या अमोल वाखारकर याने नेव्ही डेचा अतिशय सुंदर देखावा उभा केला आहे. दरवर्षी 4 डिसेंबरला गेटवे ऑफ इंडिया येथे होत असलेल्या नेव्ही दे हा देखावा सादर करताना अतिशय बारकावे दाखवत अगदी भारताची आई एन एस विक्रांत हि युद्ध नौका देखील उभारली आहे. या नेव्ही दिला होत असणारे पॅरा कमांडोंची प्रात्यक्षिके, युद्ध नौकेवरून होणारे विमानाचे टेक ऑफ आणि लँडिंग हे दाखवण्याचा प्रयत्न अमोल याने केला आहे. विक्रांत वर असणारे राफेल विमाने, मिसाईल इतर शस्त्रास्त्रे देखील त्याने यावर दाखवली होतं. आपल्या घरासमोर 15 बाय 25 फूट आकारात बनविलेला हा देखावयातून नेव्ही डे जिवंत करण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या अनेक दिवसापासून आपले काम झाले कि तो रोज या देखाव्यासाठी तासंतास काम करीत असे. दरवर्षी विविध प्रकारचे गड किल्ले उभारणाऱ्या अमोल याने यावर्षी केलेला नेव्ही डे चा देखावा सगळ्यापेक्षा हटके असा आहे.