![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Amit Shah on Muslim Reservation : सत्ता आल्यास मुस्लीम आरक्षण संपवून SC, एसटी, ओबीसींचं आरक्षण वाढवू
Amit Shah on Muslim Reservation : मुस्लीम आरक्षण संपवून एससी, एसटी आणि ओबीसींचं आरक्षण वाढवू : शाह
भोंगीर(तेलंगणा): लोकसभा निवडणुकीत भाजप पुन्हा सत्तेत आल्यास आम्ही मुस्लीम समाजाचे आरक्षण रद्द करुन अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि ओबीसी (OBC) समाजाच्या आरक्षणाची टक्केवारी वाढवू, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. ते गुरुवारी तेलंगणातील भोंगीर येथे आयोजित करण्यात आलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलत होते.
यावेळी अमित शाह यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन काँग्रेसवर हल्ला चढवला. काँग्रेस पक्ष खोटे दावे करुन लोकसभा निवडणूक लढवायची आहे. पंतप्रधान मोदी पुन्हा सत्तेत आले तर ते आरक्षण संपवून टाकतील, असे काँग्रेस पक्ष सांगतो. गेल्या 10 वर्षांमध्ये पंतप्रधान मोदी यांनी देशावर निर्विवादपणे राज्य केले आहे. पण त्यांनी आरक्षण संपवले नाही. याउलट काँग्रेस पक्षाने एससी, एसटी आणि ओबीसी समाजाचे आरक्षण लुटून मुस्लिमांना 4 टक्के आरक्षण दिले, असे अमित शाह यांनी म्हटले. भारत राष्ट्र समिती आणि काँग्रेसने याठिकाणी मुस्लिमांना जे आरक्षण दिले आहे, ते रद्द करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. हे आरक्षण आम्ही SC, ST आणि ओबीसींना देऊ, असेही अमित शाह यांनी म्हटले.
![Special Report What is Generation Beta : GI TO AI तुमची ओळख काय? तुमची जनरेशन काय?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/02/a8c87789b0b010a42259c6d5ed0ab61e1735840688647976_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Amitesh Kumar on Pune Crime|पुण्यात गुन्हेगारी, नववर्षाच्या सुरुवातीलाच खून, पोलीस आयुक्त म्हणाले...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/02/ffb3d9b2079efe6f789b698664c7dd831735837439916976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Zero Hour Full | मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने छगन भुजबळ नाराज, उद्या फडणवीसांची भेट घेणार?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/02/815e418640a20db7f588704019a8ce0e1735836111542976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Zero Hour : Guest Center | भुजबळ, देवेंद्र फडणवीसांमध्ये भेट होणार, लक्ष्मण हाके काय म्हणाले?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/02/df0feff95c9f8fea4693e5aa292b2ea81735834535542976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Zero Hour Nashik City | आपलं नाशिक स्मार्ट कधी होणार? चार-पाच वर्ष उलटूनही काम अपूर्णच ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/02/21d5c1416c56ee52e6dd256a991030f01735834023927976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)