Akshay Shinde Encounter : नराधमाचा एन्काऊंटर : सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 24 Sep 2024
Akshay Shinde Encounter : नराधमाचा एन्काऊंटर : सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 24 Sep 2024
बदलापूर मध्ये शाळेमधील शिपायाने दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती या घटनेनंतर बदलापूर पेटून उठले होते जवळपास दहा तास रेल रोको झाला अक्षय शिंदे या आरोपीला फाशी द्या अशी मागणी आंदोलन करते करत होते तब्बल एक महिन्यानंतर अक्षय शिंदे याच्या घरी एबीपी माझा ची टीम पोहोचली आहे एक महिन्यापूर्वी बदलापूर मधील खरवई गावातील त्याच्या राहत्या घरी गावकऱ्यांनी त्याच्या आई-वडिलांना भावांना मारहाण करून गावाबाहेर पिटाळून लावले होते आज एक महिन्यानंतर अक्षय शिंदे या आरोपीची पोलिसांसोबत झटापट झाली पोलिसांवरती अक्षयने गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी स्वतःच्या बचावासाठी अक्षय वरती गोळ्या झाडल्या यामध्ये आरोपी अक्षय शिंदे मयत झाला अक्षय शिंदे च्या बदलापूर मधील राहत्या घरी एबीपी माझाची टीम तब्बल एक महिन्यानंतर पोचली मात्र त्याच्या घरची परिस्थिती जैसे थे दिसून येत आहे त्याचे नातेवाईक एक महिन्यापासून घर सोडून गेले आहेत मात्र अक्षय शिंदे यांचा मृत्यू झाल्यानंतर बदलापूरमध्ये फटाके फोडण्यात आले पेढे वाटण्यात आले त्यानंतर प्रत्येक नागरिकाने आपल्या मोबाईल वरती स्टेटस ठेवून पोलिसांचे आभार व्यक्त केले आहेत आढावा घेतला