(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Akola Crime News : ऑनर किलिंगचा प्रकार हाणून पाडणाऱ्या पोलिसावरच हल्ला, अकोल्यातील प्रकाराचा Video
Akola Crime News : ऑनर किलिंगचा प्रकार हाणून पाडणाऱ्या पोलिसावरच हल्ला, अकोल्यातील प्रकाराचा Video
बातमी अकोला जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेची लक्तरं वेशीवर टांगणारी. कुटुंबियांच्या मनाविरूद्ध लग्न केलेल्या तरुणीच्या 'ऑनर किलींग'चा प्रयत्न हाणून पाडणाऱ्या पोलिसावर तरूणीच्या कुटुंबियांनी जीवघेणा हल्ला केलाय. अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातल्या पेडका पिंपरडोळी गावालगतची ही घटना आहेय. यात मुलीच्या कुटूंबियांनी उमेश सांगळे या पोलीस शिपायावर हल्ला केलाय. या हल्ल्याचा 'एक्सक्लूझिव्ह' व्हिडीओ 'एबीपी माझा'च्या हाती लागलाय. काल संध्याकाळी ही घटना घडलीये. पोलीस शिपाई सांगळेंच्या सतर्कतेमुळे या घटनेतील प्रेमविवाह केलेली तरूणी बचावलीये. दरम्यान, या घटनेत मुलीची आई आणि दोन भाऊ अशा तिघांवर अकोला जिल्ह्यातील चान्नी पोलिसांत जीवे मारण्याचा प्रयत्न आणि शासकीय कामांत अडथळा निर्माण करण्याचे गुन्हे दाखल करण्यात आलेयेत. तिन्ही आरोपींना चान्नी पोलिसांनी अटक केलीये.