Ajit Pawar speech Daund : राहुल कुल यांच्या मैदानात अजित पवार यांची बॅटिंग
Ajit Pawar speech Daund : राहुल कुल यांच्या मैदानात अजित पवार यांची बॅटिंग
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील दौंड तालुक्यात जाहीर सभा घेतली. यावेळी, तेथील भाजपा नेते राहुल कुल आणि कांचन कुल यांच्यासमवेत दौंड तालुक्यात विकासासाठी आपल्याला काम करायचं असल्याचं अजित पवारांनी म्हटले. आम्ही एकमेकांचा बांध रेटला आहे का? भांड्याला भांड लागते. आपण शब्दाचे पक्के आहोत. आपण एकमेकांसोबत काम करु. आपण यातून मार्ग काढू. तुम्ही मला ढिगाने मते द्या, मला म्हणजे बायकोला. मी चांगली शिक्षण संस्था इथे काढतो. माझी अनेकांशी ओळख आहे, बाकी मी कसे काय करायचं ते करतो. तुम्ही फक्त बटणे दाबा, असे म्हणत अजित पवारांनी सुनेत्रा पवारांसाठी दौंडकरांना आवाहन केले.























