Ajit Pawar PC : सयाजी शिंदे राष्ट्रवादीत, जबाबदारी काय? अजितदादा काय म्हणाले?
Ajit Pawar PC : सयाजी शिंदे राष्ट्रवादीत, जबाबदारी काय? अजितदादा काय म्हणाले?
सुनिल तटकरे - दुष्काळी भागात त्यांनी खूप काम केले. त्यांचे योगदान तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. त्यांचा पक्षप्रवेश हा आम्हाला उत्साह देणारा आहे. बहुजनांच्या हितासाठी आम्ही सगळ्यांनी हहा निर्णय घेतला होता. आगामी निवडणुकीतून येत्या काळात त्यांचा सहभाग आम्हाला मोलाचा ठरेल. छगन भुजबळ - उद्या दसरा आहे. आम्ही मात्र आजच आम्ही दसरा साजरा करत आहोत.या मराठी नावाने बॅालिवूडपासून टॅालीवूडपर्यंत त्यांचे मोठे काम आहे. ते अभिनेते तर आहेतच पण आता ते नेते म्हणून दिसतील त्यांचे काम कुठ मोठे आहे. सगळ्या कठिण गोष्टी त्यांनी केल्या आहेतं त्यामुळे राजकारण पण त्यांच्यासाठी कठिण राहणार नाही. एखाद्याला नेता करताना खूप कष्ट पडतात. पण तुन्ही अभिनेते आहात त्यात नेता आलाच. तुम्ही आम्हाला साथ द्यायला येत आहात ही आम्च्यासाठी अभिमानाची बाब आहे. तुमचे येणे आमच्यासाठी आम्ही योग्य आहोत ही पावती आहे. त्याच्या प्रतिमेचा फायदा आम्हाला होईल. आमच्या पक्षाला एक चांगली शक्ती मिळणार आहे. -उद्या विजयादशमी आहे. तापूर्वी आम्ही हा निर्णय घेतला यांचे मला खूप समाधान आहे. त्यांचे राजकिय क्षेत्रातील काम सुद्धा तितकेच चांगले असेल जितके सामाजिक क्षेत्रात. आम्ही नेहमी बेरजेचे राजकारण करतो. वेगवेगळ्या क्षेत्रातील आणि वेगवेगळे लोक पुढे येतील सामिल होतील अशी ग्वाही देतो. मी काही फार चित्रपट पाहत नाही. पण मी सयाजीराव यांचे काही चित्रपट पाहीले आहे. महाराष्ट्रातला कोणाताही माणूस कोणत्याही क्षेत्रात पुढे येत असेल तर मला खूप आनंद होतो. त्यांचे चित्रपट हे समाज संदेश देणारे असतात. सामाजिक प्रश्न मांडणारे असतात. त्याची माझी ओळख फार पूर्वी झाली आहे. सयाजी राव यांना झाडांची फार आवड आहे. सह्याद्री देवराई या संस्थेच्या माध्यनातून झाले लावतात. मी अनेकवेळा त्यांचे काम पाहीले आहे. आताही त्यांनी इतकी छान काही गोष्टी सांगितल्या. महाराष्ट्रातील सिद्धीविनायक आणि शिर्डीस जातात. तेंव्हा भक्ताना प्रसाद म्हणून रोप दिले. तर ते लोक वृक्षारोपण करतीलः ते पक्षाचे स्ट्रार प्रचारक म्हणून विधानसभेत काम करतील. सयाजीराव शिंदे यांचा योग्य आदर राखला जाईल. अजित दादा पवार- मी हेच सांगतोय मला उभे नका करू नका करू.. तुम्ही बरोबर मला खाली बसवले. या पक्षाच्या मला काही गोष्टी आवडला. शेती हा सगळयात सृजनशील कला आहे. मला यांना नेहमी भेटून चांगले वाटते. लाडकी बहिण योजना त्यातली एक आहे. याच्याकडून सगळ्यांकडून मी शिकेन. जी कामे माझ्या डोक्यात आहेत ती येत्या ५ वर्षाच्या काळात पूर्न करेन. सयाजी शिंदे- व्यासपीठावरील सगळे मान्यवर, पण मी काही राजकारणी नाहीं. मी कधीच राजकारणात येणार नव्हतो. मला बघून अनेकांना धक्का बसला असेल. - गेली १० वर्ष मी काम करताना मला अनुभव आला. मी २० दा मंत्रालयात गेलो असेल तर १५ वेळा दादांना भेटलो. माझी कामे झाली त्यांचे काम म्हणजे १ घाव २ तुकडे असे आहे. अचानक हा निर्णय झाला. बाहेर राहून जे प्रश्न सुटत नाहीए ते आतमध्ये जाऊन सिस्टीममध्ये काम करावे.