(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ajit Pawar Special Report : अजित पवारांच्या वाढदिवसाच्या केकवरून खमंग चर्चा
Ajit Pawar Special Report : अजित पवारांच्या वाढदिवसाच्या केकवरून खमंग चर्चा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या माईनगरी शिरूर घोडनदी येथील आश्रमाला सदिच्छा भेट दिली. यावेळी अजित पवार यांनी आश्रमातील विद्यार्थ्यांसोबत गप्पा मारून त्यांच्या सोबत वाढदिवस साजरा केला, तसेच आश्रमातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सुद्धा करण्यात केला. अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आश्रमातील मुलांनी सुद्धा अजित पवार यांना पुष्पगुच्छ देऊन हॅप्पी बर्थडे हे गाणं गाऊन जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या माईनगरी शिरूर घोडनदी येथील आश्रमाला सदिच्छा भेट दिली. यावेळी अजित पवार यांनी आश्रमातील विद्यार्थ्यांसोबत गप्पा मारून त्यांच्या सोबत वाढदिवस साजरा केला, तसेच आश्रमातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सुद्धा करण्यात केला. अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आश्रमातील मुलांनी सुद्धा अजित पवार यांना पुष्पगुच्छ देऊन हॅप्पी बर्थडे हे गाणं गाऊन जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देेवेंद्र फडणवीस या दोघांचाही आज वाढदिवस आहे त्यानिमित्त उत्साही कार्यकर्त्यांनी दक्षिण मुंबईतील राष्ट्रवादी कार्यालयासमोर दोघांनाही एकत्रित शुभेच्छा देणारे फलक लावले आहेत वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवारांची पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या आश्रमाला भेट, आश्रमातील विद्यार्थ्यांसोबत गप्पा मारत अजित पवारांनी वाढदिवस साजरा केला.