Ajit Pawar Beed Full Speech : अजित पवारांचं 37 मिनिटांचं भाषण,शरद पवारांबाबात एकही शब्द नाही
Ajit Pawar Beed Full Speech : अजित पवारांचं 37 मिनिटांचं भाषण,शरद पवारांबाबात एकही शब्द नाही
बीड : अजित पवार (Ajit Pawar) आमचे नेते असल्याचे वक्तव्य दोन दिवसांपूर्वी शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले होते. त्यामुळे राज्याच्या राजकरणात यावरून जोरदार चर्चा पाहायला मिळाली. दरम्यान आता बीड जिल्ह्यात झालेल्या सभेत अजित पवारांनी केलेल्या एका वक्तव्यावरून चर्चेला उधाण आले आहे. 'राजकारणात कुणी कुणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो' असे वक्तव्य अजित पवार यांनी केले आहे.
दरम्यान यावेळी बोलतांना अजित पवार म्हणाले की, राजकीय जीवनात चढउतार येतात, त्याना सामोरे जायचं असतं. राजकारणात कुणी कुणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो. बीडच्या सभेच्या निमित्ताने सांगायचं आहे की, आम्ही जरी युतीच्या सरकारमध्ये असलो तरी सर्व जाती धर्मात जातीय सलोखा राखला गेला पाहिजे. जनतेला हे सरकार आपलं आहे हे आम्ही कृतीतून दाखवून देऊ म्हणाले. त्यामुळे अलीकडच्या काही सभेत अजित पवार जातीय सलोख्या बाबत हे सातत्यानं बोलताना पाहिला मिळत आहेत.
पुढे बोलतांना अजित पवार म्हणाले की, विरोधक सातत्याने दिशाभूल करत आहेत. कांदा प्रश्न झाला त्यावेळी आम्ही धनंजय मुंडे यांना दिल्लीत जाऊन पियुष गोयल यांची भेट घेण्याचे सांगितले. मी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातत्याने पियूष गोयल यांच्यशी बोलतं होतो. त्यानंतर 2410 किलो प्रती क्विंटल भाव काढला. 2 लाख क्विंटल कांदा आम्ही खरेदी करण्याचा निर्णय घेतला, असल्याचं अजित पवार म्हणाले. तर, शेतकऱ्याचा शिवारात पाणी आल्याशिवाय शांत बसणार नाही. पश्चिमेकडील पाणी पूर्वेकडे वळवल्याशिवाय मराठवाड्याचा पाणी प्रश्न सुटणार नाही. 1 लाख कोटी रुपये लागले तरी चालतील मराठवाड्याला पाणी द्यायचा निर्णय घेतला आहे. जनतेचे प्रश्न सोडवायचे असतील तर सत्तेत असणं गरजचे आहे. म्हणुन आम्ही हा निर्णय घेतला असल्याचं पवार म्हणाले.