Ahmednagar Nilesh Lanke Banner : अहमदनगरमधील निलेश लंकेंच्या कार्यालयासमोर इंग्रजीतून बॅनर
Ahmednagar Nilesh Lanke Banner : अहमदनगरमधील निलेश लंकेंच्या कार्यालयासमोर इंग्रजीतून बॅनर
लोकसभा निवडणुकीत अहमदनगर मतदारसंघाची (Ahmednagar Lok Sabha Constituency) जोरदार चर्चा झाली. शरद पवार गटाच्या निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी भाजपच्या सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांचा पराभव केला. सुजय विखेंचा पराभव करुन निलेश लंके हे जायंट किलर ठरले. तर अहमदनगर लोकसभा निवडणुकीचा प्रचारही राज्यभरात गाजला. सुजय विखे पाटील यांनी निलेश लंके यांच्यावर इंग्रजी भाषेवरुन (English Language) टीका केली होती. मी जेवढी इंग्रजी बोलतो तेवढी इंग्रजी समोरच्या उमेदवाराने पाठ करून जरी बोलून दाखवली तरी मी उमेदवारी अर्ज भरणार नाही, असे त्यांनी म्हटले होते. यानंतर निलेश लंके यांनी संसदेत इंग्रजीत शपथ घेऊन सुजय विखे पाटलांना प्रत्युत्तर दिले होते. आता निलेश लंकेंच्या समर्थकांनी इंग्रजीत बॅनर लावून सुजय विखेंना डिवचले आहे.
अहमदनगर शहरातील राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यात सुजय विखेंनी संसदेत इंग्रजीत केलेल्या भाषणाचा एक व्हिडीओ दाखवण्यात आला होता. याचा आधार घेत सुजय विखेंनी निलेश लंकेंनी इंग्रजी बोलण्याचे आव्हान दिले होते. याचे पडसाद राज्यभर उमटले होते. निलेश लंके यांनी सुजय विखे यांचे आव्हान स्वीकारले होते. इंग्रजी ही केवळ एक भाषा आहे. ती शिकायची म्हटल्यास त्यामध्ये काय अवघड आहे, असे प्रत्युतर निलेश लंके यांनी दिले होते. त्यांनतर संसदेत इंग्रजी भाषेत खासदारकीची शपथ घेऊन निलेश लंके यांनी विखे-पाटील यांना प्रत्युत्तर दिले होते.