Nashik : होशिंग कुटुंबाचं कौतुकास्पद पाऊल ,5 मुलांना प्रत्येकी 10 हजारांची मदत ABP MAJHA
कोरोनाच्या संकटकाळात वडिलांचं छत्र हरपलेल्या मुलांना अहमदनगर जिल्ह्यातल्या सोनई गावातील होशिंग कुटुंबाने मदतीचा हात दिलाय.. गेल्या वर्षी सोनई गावातील अनिल होशिंग यांचं कोरोनामुळे निधन झालं होतं.. पण वर्षश्राद्ध असल्याने केवळ पुजापाठ न करता अनाथ मुलांना मदत केलीय.. ज्या मुलांच्या वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय अशा ५ मुलांना प्रत्येकी १० हजार रुपयांचं राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र देण्यात आलं.. रोख रक्कम देण्यापेक्षा राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र दिल्यास पुढील उच्च शिक्षणाला उपयोग होऊ शकतो या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आलंय.. एकल पुनर्वसन समितीचे हेरंब कुलकर्णी यांच्या पुढाकारातून ही मदत देण्यात आली..





















