Administrator on Municipalities:पालिकांवर प्रशासक नेमणे म्हणजे नक्की काय? जबाबदाऱ्या काय? ABP Majha
सध्या सगळीकडेच निवडणुकांचे वारे वाहत आहेत आहेत, आपण पाहतोय. सत्तेतले आणि विरोधातले असे दोघं कबंर कसून कामाला लागलेत. पण निवडणुका अगदी तोंडावर आल्या तरी अद्याप काही कामं बाकीयेत. मतदार याद्यांचं अपडेशन असो किंवा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा किंवा इतर काही महत्वाच्या बाबी असो. यामुळे झालंय असं की मुंबईसह राज्यातील दहा महापालिकांचा निवडणूक कार्यक्रम लांबणीवर पडला आहे. आणि आता या सगळ्यांमुळे आपण एकच गोष्ट वारंवार ऐकतोय ती म्हणजे महापालिकांवर प्रशासक नेमण्याची! मुदत संपलेल्या महापालिकांवर राज्य सरकारला प्रशासक नेमावा लागणार आहे. काही पलिकांवर तर प्रशासक नेमून झालाय. पण प्रशासक नेमणं म्हणजे नक्की काय आणि प्रशासक नेमल्यावर असे काय बदल होणारेत? शिवाय प्रशासकाच्या अखत्यारीत कोणते हक्क येतात? एकंदरीत या प्रश्नांच्या उत्तरांचा आढावा घेऊयात या व्हिडीओच्या माध्यमातून.