Aaditya Thackeray listed in Young Global Leaders : यंग ग्लोबल लिडर्सच्या यादीत आदित्य ठाकरेंचं नाव
शिवसेनेतल्या ऐतिहासिक फुटीनंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर राजकीय संघर्षाची वेळ आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानंं शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्हही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला बहाल केलं. त्यामुळं ठाकरे पितापुत्रासमोरचा संघर्ष आणखी कठीण बनला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आमदार आदित्य ठाकरेंची उमेद वाढवणारी एक घडामोड घडली आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये आदित्य यांच्या नावाचा यंग ग्लोबल लीडर्सच्या यादीत समावेश करण्यात आलाय. जगभरातील आश्वासक तरुण नेत्यांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. आदित्य ठाकरे यांच्यासह भाजप युवा मोर्चाचे मधुकेश्वर देसाई यांच्या नावाचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे.



















