(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 5 सप्टेंबर 2021 रविवार | ABP Majha
देश विदेशातील ठळक घडामोडी
1. टोकियो पॅरालिम्पिकमध्ये कालचा दिवस भारताच्या नावे, दोन सुवर्णांसह एकूण चार पदकं जिंकली
2. मुंबई आणि लगतच्या उपनगरांत आज मुसळधार, तर उद्या अतिमुसळधार पावसाचा इशारा, कोकण, मराठवाडा, विदर्भासह 15 जिल्ह्यांना यलो अलर्ट
3. काल राज्यभरात विक्रमी लसीकरण, एकूण 12 लाख जणांना मिळाला डोस, आतापर्यंत मुंबईत एक कोटीहून अधिक जणांना पहिला डोस
4. सहाय्यक आयुक्त पिंपळे हल्ला प्रकरण, आरोपी अमरजीत यादवला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
5. पूरग्रस्तांच्या मदतीसाठीची राजू शेट्टींची पदयात्रा आज नृसिंहवाडीत धडकणार, सरकारनं आंदोलनाची दखल न घेतल्यानं जलसमाधी आंदोलनाचा इशारा
6. विदर्भातल्या प्रस्तावित फिल्म सिटीसाठी हालचालींना वेग, अभिनेता संजय दत्तनं दुसऱ्यांदा घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट
7. मध्य रेल्वेला जोडणाऱ्या ट्रान्स हार्बरवरील कळवा-ऐरोली उन्नत मार्गाचं काम पाच वर्षांपासून रखडलं, प्रकल्पाची किंमत 100 कोटींच्या वर
8. सेलिब्रेटी महिलेचा फोटो वापरुन दिल्लीच्या डॉक्टरवर हनी ट्रॅप, दोन कोटींची फसवणूक, यवतमाळचा आरोपी जेरबंद
9. पाकिस्तानच्या आयएसआयचे प्रमुख फैज हमीद काबूलमध्ये, तालिबान सरकारचा प्रमुख मुल्ला बरादरशी खलबतं, भारताची वेट अँड वॉचची भूमिका
10. ओव्हल कसोटीच्या दुसऱ्या डावात रोहित शर्माच्या शतकामुळं भारताला 171 धावांची आघाडी, अंधूक प्रकाशामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला