ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 22 April 2025
ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 22 April 2025
आमच्याकडे २३७ आमदार, ज्यांना युतीत राहायचं ते राहतील, अन्यथा बाहेर जातील, नांदेडचे पालकमंत्री अतुल सावेंचा शिवसेना आमदार बाबुराव कदमांना इशारा
काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांचा भाजपमध्ये प्रवेश, पक्ष सोडण्याची वेळ काँग्रेसनेच आणली, थोपटेंचा जाताजाता घणाघात
राज-उद्धव एकत्र येण्याची चर्चा पुढच्या महिन्यातच शक्य, दोघेही परदेश दौऱ्यावर, राज ठाकरे ३० एप्रिलला तर उद्धव ठाकरे ४ मे रोजी मुंबईत परतणार..
विद्या प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाला शरद पवार आणि खासदार सुनेत्रा पवार एकत्र, युगेंद्र पवारांनी वाढदिवसानिमित्त घेतले सुनेत्रा पवारांचे आशीर्वाद...
मुंबईतील जैन मंदिर जमीनदोस्त केल्यानंतर जैन समाजाकडून राज्य अल्पसंख्याक आयोगाला तक्रार, आज तातडीची सुनावणी, मनपा आयुक्त, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना हजर राहण्याच्या सूचना
मुंबईतल्या मंदिर पाडकामाविरोधात पुण्यामध्ये जैन समाजाचा आक्रोश, हजारो जैन बांधवांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं..























