ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 15 May 2025
ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 15 May 2025
सिंधू पाणी करार स्थगितच राहणार, पाकव्याप्त काश्मीरबाबत तिसऱ्या देशाची मध्यस्थी मान्य नाही, परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तान आणि अमेरिकेला सुनावलं
पाकिस्तानविरोधात ऑपरेशन सिंदूर सुरू असताना चीनच्या सीमेवर भारताच्या तिन्ही दलांचा जोरदार युद्धसराव, मोहिमेला ऑपरेशन तीस्ता प्रहार नाव
काश्मीरच्या त्रालमध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश, पहलगाम हल्ल्यानंतर कुख्यात १४ दहशतवाद्यांची यादी तयार, ४८ तासांच ६ जणांचा खात्मा
त्यांनी धर्म विचारुन मारलं, आम्ही कर्म बघून अद्दल घडवली, श्रीनगर एअरबेसवर सैनिकांचा उत्साह वाढवताना राजनाथ सिंहांचं वक्तव्य,
बेजबाबदार पाकिस्तानची अण्वस्त्र ताब्यात घ्या, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचं आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संघटनेला आवाहन.
पाकिस्तानच्या कुठल्याच अणुकेंद्रातून अणुगळती झालेली नाही, आंतरराष्ट्रीय अणुुऊर्जा संघटनेचा खुलासा, भारतानं सरगोधा हवाई तळावर हल्ला केल्यापासून चर्चांना ऊत






















