ABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 20 May 2025
ABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 20 May 2025
हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्राच्या डायरीची पानं एबीपी माझाच्या हाती, ज्योतीकडून पाकिस्तानबद्दल गुणगान
भारतासाठी अंडरकव्हर एजंट म्हणून काम करणाऱ्यांबाबत पाकिस्तानच्या आयएसआयकडून ज्योतीकडे विचारणा, व्हॉट्सअॅप चॅट उघड झाल्यानं पर्दाफाश
पाकिस्तान उच्चायुक्तालयातील अधिकारी दानिशकडून पैसे आणि लग्नाचं आमिष, गद्दार हेर गजालाचा कबुलीनामा, तर भारताची लष्करी माहिती देण्याच्या बदल्यात दानिशकडून कमिशन, गद्दार यामीनची माहिती
अटक करण्यात आलेला हेर नोमानच्या मोबाईलमध्ये ७० पेक्षा जास्त पाकिस्तानी नंबर्स, तर देवेंद्रसिंह ढिल्लोकडे पाकिस्तानच्या विक्कीकडून भारतीय सिमची मागणी,
शस्त्रसंधीसाठी भारत नव्हे तर पाकिस्तान अमेरिकेकडे गेला हे जगाला सांगा, परदेश दौैऱ्यावर जाणाऱ्या खासदारांच्या शिष्टमंडळाला परराष्ट्र खात्याचं मार्गदर्शन
भारताविरोधात कुरघोड्या करणाऱ्या पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरला प्रमोशन....आसीम आता फिल्ड मार्शल
ऑपरेशन सिंदूरबाबत प्रश्न विचारणाऱ्या राहुल गांधींवर भाजपकडून टीकेचा स्ट्राईक, आसीम मुनीरच्या चेहऱ्यासोबत राहुल गांधींचा फोटो, तर मंत्री गिरीराज यांच्याकडून चिनी बनावटीच्या पाकिस्तानी मिसाईलची उपमा





















