ABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 19 April 2025
ABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 19 April 2025
यवतमाळ जिल्ह्यातल्या कारेगाव पारधी बेड्यावर हंडाभर पाण्यासाठी जीव पणाला, साखळी करून विहिरीत उतरत पाणी भरण्याची वेळ, आतापर्यंत सहा ग्रामस्थांनी गमावलाय पाण्यासाठी जीव
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सिग्नल बिघाडामुळे कसारा ते कल्याण मार्गावरही वाहतूक ठप्प, विविध स्थानकांवर गाड्या खोळंबल्या
हायकोर्टाचा मनाई आदेश असतानाही मुंबईतल्या विलेपार्लेमध्ये महापालिकेनं जैन मंदिर पाडलं, जैन समाजाचं महापालिकेविरुद्ध आंदोलन
हिंदीच्या सक्तीला विरोध करणारे इंग्रजीच्या सक्तीविरुद्ध का बोलत नाहीत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा राज ठाकरेंना सवाल,
महाराष्ट्र आणि मराठीला सर्वात जास्त धोका गुजरातपासून, संजय राऊतांची जळजळीत टीका... भाजपसोबत ठरवूनच महापालिकेसाठी राज ठाकरेंचा जागर, राऊतांनी डिवचलं.
सोलापुरातील प्रसिद्ध न्युरोसर्जन डॉक्टर शिरीष वळसंगकरांची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या...वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ...आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट...
दीनानाथ आणि डॉ.घैसासांविरुद्ध चकार शब्द न बोलणारा ससूनचा अहवाल जाळून टाका, सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला संताप, असा रिपोर्ट येऊच कसा शकतो असा सवाल























