ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 01 May 2025
ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 01 May 2025
दहशतवादी पहलगाममध्ये २ ते ३ दिवस आधीच झाले होते दाखल, एनआयएच्या तपासात माहिती समोर, २० आणि २१ तारखेला पाऊस पडला,आणि २२ तारखेला पर्यटक वाढल्यावर हल्ला, सूत्रांची माहिती
पहलगाम हल्ल्याशी संबंधित एफआयआर 'माझा'च्या हाती, हल्ल्याचा तपशीलवार घटनाक्रम नमूद, पाकमधील सूत्रधारांकडून दहशतवाद्यांना सूचना मिळत असल्याचा एफआयआरमध्ये उल्लेख
NIA प्रमुख सदानंद दाते पहलगाममध्ये दाखल, पथकासह करणार घटनास्थळाची पाहणी, NIA कडून सलग दुसऱ्या दिवशी बैसरन खोऱ्यात तपास
एनआयएकडून जम्मू-काश्मीरमध्ये हुर्रियत नेत्यांच्या ठिकाणांवर छापेमारी, पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांसाठी तरुणांचं नेटवर्क बनवल्याची सूत्रांची माहिती
पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत अमेरिकेचं भारताला खुलं समर्थन तर हल्ल्याच्या तपासात पूर्ण सहकार्य करावं, पाकिस्तानला आवाहन
भारताच्या आक्रमक पवित्र्यानंतर पाकिस्तानात घबराट...आयएसआय प्रमुख मोहम्मद असीम मलिक यांच्याकडे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपद























