ABP Majha Marathi News Headlines 02 PM TOP Headlines 23 April 2025
ABP Majha Marathi News Headlines 02 PM TOP Headlines 23 April 2025
पहलगाम हल्ल्यातील चार दहशतवाद्यांचा फोटो समोर, चौघेही पाकिस्तानी असल्याचं उघड, दहशतवाद्यांना स्थानिक स्लीपर सेलचीही मदत मिळल्याचा संशय
पहलगाम हल्ल्यानंतर सर्व दहशतवादी रात्रीच पाकिस्तानात परत गेल्याची शक्यता, ४० मिनिटे बेधुंद गोळीबार करुन अतिरेक्यांकडून २६ जणांची हत्या'
पहलगाममध्ये ४ दहशतवाद्यांचा गोळीबार कॅमेऱ्यात कैद, हल्लेखोर आदिल गुरी आणि आसीफ शेखची ओळख पटली,
लष्कर ए तोयबाचा कमांडर सैफुल्लाह कसुरी उर्फ खालिद हा हल्ल्याचा मास्टरमाईंड असल्याची माहिती , पाकिस्तानच्या रावळकोटमध्ये हल्ल्याचा कट रचला गेल्याची शक्यता
पहलगामच्या हल्लेखोरांना सोडणार नाही, भारत सरकार दहशतवादासमोर झुकणार नाही, अमित शाहांची एक्स पोस्ट चर्चेत, भारत मोठ्या कारवाईच्या तयारीत असल्याची चर्चा
दिल्लीत तिन्ही सैन्यदल प्रमुख, सीडीएस यांची संरक्षणमंत्र्यांशी बैठक, सैन्यदलप्रमुखांनी बदला घेण्याचा पर्याय सुचवल्याची माहिती, कोणत्या पद्धतीने बदला घ्यायचा यावर चर्चा

















