ABP Majha Marathi News Headlines 8:00 AM TOP Headlines 12 April 2025
ABP Majha Marathi News Headlines 8:00 AM TOP Headlines 12 April 2025
शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी आज गृहमंत्री अमित शाह रायगडावर, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्रीही सोहळ्याला उपस्थित राहणार, अमित शाह आणि फडणवीस रायगडावर एकत्र जाणार
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काल पुण्यात घेतली भेट, राज्यातल्या विविध विषयांवर चर्चा, रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटणार का याची उत्सुकता
अमित शाहांचा दौऱ्यादरम्यान रायगडावरील रोपवे सुरूच राहणार, सर्वसामान्य शिवभक्तांना गडावर प्रवेशबंदी नाही, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मुंबईत रखडलेल्या ६८ झोपडपट्टी पुनर्विकास योजना मार्गी लावण्याची जबाबदारी बीएमसीवर, ५० हजार झोपड्यांच्या पुनर्वसनाला गती मिळणार
मुंबईत पाणीटँकर संघटनेचा संप सुरूच, हाऊसिंग सोसायट्या, मॉल, हॉटेलांना पाणीटंचाई, चंद्रकांत पाटलांशी झालेल्या बैठकीत तोडगा नाहीच, ४८ तासांत तोडगा न निघाल्यास आदित्य ठाकरेंचा सरकारला आंदोलनाचा इशारा























