ABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 17 June 2024
छगन भुजबळांनी आता वेगळी भूमिका घ्यावी, समता परिषदेच्या बैठकीत ओबीसी कार्यकर्त्यांची मागणी, भुजबळांच्या निर्णयाकडे लक्ष
पंतप्रधान मोदींकडे जातनिहाय जनगणनेची मागणी करणार, ओबीसींच्या विरोधात निर्णय होत असेल तर लक्ष्णम हाकेंसोबत आंदोलनात उतरणार, छगन भुजबळांचा इशारा
भाजपच्या कोअर कमिटीची उद्या नवी दिल्लीत बैठक, महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांना निमंत्रण, उपमुख्यमंत्री पद सोडण्याच्या फडणवीसांच्या प्रस्तावावर चर्चा होण्याची शक्यता
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम प्रांताची पुण्यात बैठक, लोकसभा निवडणुकीतील सुमार कामगिरीवर भाजप नेत्यांशी चर्चा
मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाच्या मतमोजणीत १९व्या फेरीपासून पारदर्शकतेचा अभाव, अनिल परबांचा आरोप, एआरओ आणि आमच्या मतांमध्ये ६५० मतांचा फरक, परबांचा दावा.
उत्तर-पश्चिम मुंबईमधील निकाल हा आदर्श घोटाळा, संजय राऊतांचा आरोप, रविंद्र वायकरांना खासदारकीची शपथ घेण्यापासून रोखण्याचंही आवाहन
विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंचं मिशन
'मॅक्झिमम विदर्भ', भास्कर जाधवांवर खास जबाबदारी देणार, माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती, विधानसभेच्या जागावाटपाबाबत अद्याप निर्णय नाही, नाना पटोलेंचं स्पष्टीकरण