ABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 05 May 2025
ABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 05 May 2025
भारतीय शक्तिप्रदर्शनानंतर घाबरलेल्या पाकिस्तानची जगभर धावाधाव, अमेरिका, रशिया, तुर्कस्तानसह इस्लामी देशांकडे पसरला पदर, भारताला रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्रांना साकडं,
आज सुरक्षा परिषदेची बैठक
भारताने पाकिस्तानचं पुन्हा दाबलं नाक, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे दरवाजे अचानक केले बंद, गाळ उपशाचं दिलं कारण, चिनाब कोरडी झाल्यास पाकिस्तानातील पंजाबची पाणीकोंडी
दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानला तुर्कस्तानचा पाठिंबा...तुर्कस्तानची युद्धनौका कराची बंदरात दाखल...मोठे देश भारतासोबत मात्र तुर्कस्तानची पाकिस्तानशी हातमिळवणी...
भारत आणि जपान संरक्षणमंत्र्यांची महत्त्वाची बैठक, तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षेवर बैठकीत चर्चा
पहलगाम हल्ल्याच्या मुदद्द्यावरून सरकारला पाठिंबा देणाऱ्या पवारांची अडचण वाढू नये म्हणून सर्वपक्षीय बैठकीला दांडी, संजय राऊतांकडून पवारांसोबत झालेल्या चर्चेचा तपशील जाहीर






















