ABP Majha Headlines : 11 PM : 07 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 11 PM : 07 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
लोकसभेच्या जागावाटपावरुन शिवसेना आणि भाजपामध्ये वादाची ठिणगी, केसाने गळा कापू नका, विश्वासघात करू नका, राज्यातल्या भाजप नेत्यांना रामदास कदमांचा इशारा
रामदास कदमांना टोकाची वक्तव्य करण्याची सवय.. भाजपचा मुख्यमंत्री शिंदेंना पूर्ण पाठिंबा, उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया तर महायुतीत केवळ दोन ते तीन जागांवरून किरकोळ मतभिन्नता, फडणवीसांचं विधान
महायुतीच्या जागावाटपात मोठ्या प्रमाणात उमेदवारांची अदलाबदल होण्याची शक्यता, शिंदे - अजित पवारांचे काही उमेदवार भाजपच्या चिन्हावर लढण्याची शक्यता
शिवसेना आमदार अपात्रताप्रकरणी ८ एप्रिलला पुढील सुनावणी, अध्यक्षांपुढील सुनावणीतली मूळ कागदपत्रं सुप्रीम कोर्टाने मागवली
राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप शिवाजी पार्कमध्ये होणार, सभेला राज्य सरकारची परवानगी, १७ मार्चला सभा
कोस्टल रोडची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी, मुख्यमंत्र्यांनी केला कोस्टल रोडवरून प्रवास, मुंबईत कोस्टल रोडलगत ३२० एकरांवर झाडं लावणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा