(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 11 AM: 30 July 2024 : Maharashtra News
एसटी कर्मचाऱ्यांचा ९ ऑगस्टपासून संपाचा इशारा, शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनाची मागणी, १३ संघटना संपात सहभागी होणार
उरणमधील यशश्री शिंदे हत्याकांड प्रकरणातील आरोपी दाऊद शेख उरण पोलिसांच्या ताब्यात, लवकरच कलबुर्गीतून नवी मुंबईत आणणार
मिलिंद मोरे मृत्यू प्रकरणी विरारमधील सेवन सी रिसॉर्ट जमीनदोस्त, पहाटे तीन वाजेपर्यंत सुरु होतं तोडकाम
नाव आणि वेश बदलून करताना अजितदादांनी सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवले का, सुप्रिया सुळेंचा सवाल, एअरलाईनलाही जाब विचारणार
मराठा क्रांती ठोक मोर्चाचं आज मातोश्रीवर जबाब दो आंदोलन, सोमवारी सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाची भेट न झाल्याने ठोक मोर्चा आक्रमक
राजू शेट्टींनी अंतरवाली सराटीत घेतली मनोज जरांगेंची भेट, दोघांमध्ये दीड तास संवाद, सामाजिक विषयांवर चर्चा झाल्याची शेट्टींची माहिती
वादग्रस्त IAS पूजा खेडकरांचा दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज, दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी धावाधाव
IAS पूजा खेडकर ७ दिवसांनंतरही मसुरीत हजर न राहिल्याची गंभीर दखल, DOPT कडून नोटीस, २ ऑगस्टपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश