ABP Majha Headlines : 09 PM: 01 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच...महायुतीला २४ तर मविआला २३ जागा...एबीपी माझा सी वोटर सर्व्हेचा अंदाज...
एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात भाजपला सर्वाधिक १७ जागा...पण दोन पक्ष सोबत घेऊनही फायदा नाही...ठाकरेंच्या शिवसेनेला ९, तर शिंदे गटाला ६ जागा मिळणार...
कमी जागा लढवूनही शरद पवारांच्या राष्ट्रवादीला चांगलं यश...काँग्रेसलाही फायदा...पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकच जागा मिळण्याचा अंदाज...
कर्नाटकसह दक्षिण भारतात भाजपची मुसंडी, आंध्र-तेलंगणात भाजपला मोठं यश मिळण्याची शक्यता, भाजप तमिळनाडू, केरळमध्येही खातं खोलणार, एक्झिट पोलचा अंदाज
इंडिया आघाडी देशात २९५हून अधिक जागा जिंकेल, इंडियाच्या बैठकीनंतर खरगेंनी व्यक्त केला विश्वास, तर एक्झिट पोलच्या चर्चेत काँग्रेसही सहभागी होणार
उत्तर भारतात पुन्हा भाजपचं कमळ फुलणार, उत्तर प्रदेशात एनडीएला ६२ ते ६६ जागांचा अंदाज, बिहारमध्येही ३४ ते ३८ जागा मिळण्याची शक्यता
एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये एनडीएला २३ ते २७ जागांचा अंदाज, तर ममता बॅनर्जींच्या तृणमूलच्या जागा घटणार
पुणे अपघातप्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या जागी आईने स्वतःचं रक्त दिल्याची कबुली, शिवानी आणि विशाल अगरवालने कट रचला, मुलगाच गाडी चालवत असल्याची कबुली
अपघात झाल्यावर स्थानिक आमदारानं पोलीस स्टेशनमध्ये जाणं स्वाभाविक, सुनील टिंगरेंवरील आरोपांबाबत अजित पवारांचं वक्तव्य
((अजितदादांकडून टिंगरेंची पाठराखण))





















