ABP Majha Headlines : 8 AM : 20 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 8 AM : 20 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अमित शाहांसोबतच्या भेटीत राज ठाकरेंकडून मुंबईतल्या दोन जागांची मागणी, शाहांकडून मात्र एकाच जागेची ऑफर
विधानसभेची चर्चा विधानसभा निवडणुकीच्या वेळीच करू, उद्धव ठाकरेसोबत जे घडलं त्याची पुनरावृत्ती नको, राज ठाकरेंसमोर अमित शाहांची स्पष्ट भूमिका
मनसे आणि महायुतीची चर्चा आता राज्यपातळीवरच होणार, राज ठाकरे आज मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांना भेटण्याची शक्यता
महाराष्ट्रात आणखी एक ठाकरे चोरण्याचा प्रयत्न, राज ठाकरे आणि शाहांच्या भेटीवर उद्धव ठाकरेंची टीका
बारामती लोकसभेची निवडणूक लढवण्यावर विजय शिवतारे ठाम, आज भोर परिसराचा दौरा करणार, थोपटे कुटुंबीयांची भेट देखील घेणार
महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी २१ मार्चला जाहीर होणार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची एबीपी माझाला एक्स्लुझिव्ह माहिती, सांगली, भिवंडी काँग्रेसचं लढणार, पटोलेंचा निर्धार.
सांगलीची जागा १०० टक्के ठाकरे गटाचीच, संजय राऊतांचा दावा, ठाकरे गटाने परस्पर उमेदवार जाहीर केल्याने काँग्रेस नेते आज दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करण्याची शक्यता