ABP Majha Headlines : 7 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 07 Dec 2024 : ABP Majha
ABP Majha Headlines : 7 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 07 Dec 2024 : ABP Majha
विधानसभेचं तीन दिवसांचं विशेष अधिवेशन आजपासून...नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी आणि विधानसभा अध्यक्षांची निवड होणार...कालिदास कोळंबकर हंगामी अध्यक्ष...
उपमुख्यमंत्री अजित पवारांना मोठा दिलासा...आयकर विभागानं जप्त केलेली संपत्ती मुक्त...दिल्ली ट्रिब्यूनल कोर्टाचा निर्णय...
शिवसेनेसमोर गृहमंत्रिपदाच्या बदल्यात तीन वजनदार खात्यांचा पर्याय...महसूल, जलसंपदा आणि सार्वजनिक बांधकाम यापैकी एकाबाबत शिवसेनेचा विचार सुरु असल्याची माहिती...
राज ठाकरेंसोबत विचार जुळत असल्यानं त्यांना सोबत ठेवण्यात रस... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य...पालिकेला शक्य असेल तिथं मनसेला सोबत घेणार, फडणवीसांची माहिती
शेतकऱ्यांबाबत जुमलेबाजीचा गुजरात पॅटर्न राज्यात नको, ठाकरेंचे उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील यांचं फडणवीसांना उद्देशून ट्विट, सोयाबीन खरेदीबाबत फडणवीसांनी चुकीची माहिती दिल्याचा आरोप
श्रीकर परदेशी यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सचिवपदी नियुक्ती...श्रीकर परदेशी हे २००१च्या बॅचचे आयएएस अधिकारी...