ABP Majha Headlines : 4 PM : 26 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 4 PM : 26 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
महाराष्ट्रात दुपारी ३ वाजेपर्यंत ४३.१ टक्के मतदान, तर देशात ५४.६७ टक्के मतदान, देशात सर्वात कमी मतदान महाराष्ट्रात
अमरावतीत राणा दाम्पत्यानं बजावला मतदानाचा हक्क, श्रीराम प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर मतदान
मनोज जरांगे यांनी बजावला मतदानाचा हक्क, मतदान करताना लेकरांना डोळ्यांसमोर ठेवा, मतदारांना आवाहन
परभणीतील बलसा खुर्दच्या ग्रामस्थांकडून मतदानावर टाकलेला बहिष्कार मागे, जिल्हाधिकाऱ्यांनी काढली समजूत, एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट
नाशिकची जागा शिवसेनेचीच, आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी उमेदवार घोषित करणार, संजय शिरसाट यांची माहिती
महायुतीचे ईशान्य मुंबईचे उमेदवार मिहिर कोटेचा यांनी भरला अर्ज, अर्ज भरण्याआधी काढलेल्या प्रचार रॅलीत देवेंद्र फडणवीस सहभागी
रणजीतसिंह नाईक निंबाळकरांसाठी फडणवीस प्रचार करणार, माढ्यात येत्या रविवारी तीन सभा घेणार