ABP Majha Headlines : 31 OCT 2024 : 07 PM : TOP Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 31 OCT 2024 : 07 PM : TOP Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स
महायुतीचं सरकार आल्यास मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? माझा व्हिजनमध्ये राज ठाकरेंनी भाजपावर शिक्का मारल्यानं चर्चेला तोंड, फडणवीस-शिंदेंची सावध प्रतिक्रिया
जे बंडखोर माघार घेणार नाही त्यांच्यावर कारवाई, भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा इशारा, तर काँग्रेसमधील 36 बंडखोरांना चेन्नीथलांचा फोन, पवार आणि ठाकरेंसमोरही बंडोबांचं आव्हान
महायुतीला राज्यात २०० जागा मिळतील, एबीपी माझाच्या मुलाखतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आत्मविश्वासपूर्ण दावा...
विधानसभेसाठी मनोज जरांगेंकडून मराठा, मुस्लिम आणि दलित समीकरणाची जुळवाजुळव, कोणत्या मतदारसंघात उमेदवार उभे करणार याची तीन तारखेला घोषणा
चिंचवडमधून बंडखोरी करणाऱ्या नाना काटेंच्या मनधरणीचा अजित पवारांकडून प्रयत्न... काटे मात्र अपक्ष निवडणूक लढण्यावर ठाम...
वांद्रे पश्चिममधून अर्ज भरताना आशिष शेलारांनी माहिती लपवली... काँग्रेस खासदार वर्षा गायकवाडांचा आरोप.. निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार